एक नजर

परिचय

मेघना बोर्डीकर-साकोरे, प्रेमळपणे "मेघना दीदी" म्हणून ओळखल्या जातात. दोन दशकांहून अधिक काळ राजकीय क्षेत्रात त्यांनी अनुभवलेल्या अनेक महत्त्वाच्या विभागांसाठी त्यांनी काम केले. परभणी - विविधतेतून एकता असलेला हा जिल्हा प्रगतीपथावर आणण्याचे त्यांचे ध्येय आहे. तसेच विकास सर्वसमावेशक असावा. समाजातील सर्व घटकांचा समावेश करून समाजाची प्रगती साधता येते हे सुनिश्चित करणे महत्वाचे आहे.

(आता एकच ध्यास - परभणी विकास)

  - मेघना दीदी

विकासाचा रस्ता तयार करणे हे अपरिहार्य आहे आणि मला विश्वास आहे की दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या प्रयत्नातून परभणीचे लोक स्वप्न पूर्ण करतीलच. मुळात माझ्या लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी आतापर्यंत १००० हून अधिक गावांना भेट दिली आहे . गावोगावचे तरुण दीपस्तंभासाठी स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत ज्यायोगे आम्ही थेट लोकांशी जोडले जातो. लोकांची सेवा करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे समाजकारण आणि दीपस्तंभ याचा एक भाग असल्याने मला आमची स्वप्ने सत्यात उतरविण्याची संधी मिळाली. सेलु, जिंतुर मतदार संघातील माझ्या लाखो बंधू भगिनिनी आणि पित्रुतुल्य मातृतूल्य माझ्या परभणीकरांनी मला आमदार म्हणून निवडून दिले, याबद्दल मी सर्व मतदात्यांचे शतषः आभारी आहे.

मला असे वाटते कि राजकारण हे जनतेच्या विकासासाठी असावे ना कि स्वतःच्या स्वार्थासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच सर्व सामान्य व्यक्तींना समोर ठेवून त्यांच्या विकासासाठी राजकरण केले आणि मी हि त्यांच्या विचारांशी प्रेरित होऊन तसे करण्यासाठी माझा प्रयत्न प्रयत्नशील आहे . मी माझ्या जिंतूर आणि सेलू मतदार संघातील जनतेशी मी कधीही राजकारण करणार नाही , तसेच सर्वांगीण विकास समोर ठेवून परभणीच्या शैक्षणिक , आर्थिक , सामाजिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे ध्येय मी हाती घेतले आहे.

सामाजिक कार्यक्षेत्र

  • कृषी व जल संधारण
  • सामाजिक अभियांत्रिकी, पर्यावरण
  • मुलींचे शिक्षण आणि महिला सशक्तीकरण
  • शेतकरी सशक्तीकरण आणि कल्याण
  • शिक्षण
  • आरोग्य

सौ. मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी परभणीतील सर्व सामान्य जनतेच्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यात नेहमीच प्रयत्नशील राहिल्या आहेत आणि म्हणूनच सर्व सामान्य नागरिकांच्या अगदी लहान मुलांपासून ते थोर व्यक्तींच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हास्य असते. शेतकरी व कष्टकरी तसेच गावातील युवा पिढींच्या विकासासाठी मेघना दीदींनी केलेली कार्ये हि परभणीच्या सामाजिक विकासाला हातभार लावणारी आहेत.


प्रकल्प आणि इतर घडामोडी

अधिक माहिती, नवे अपडेट्स, प्रकल्प आणि विविध घडामोडी व्हिडिओच्या माध्यमातून थेट जाणून घ्या.


मराठा आरक्षण

पाथरी आणि मानवत येथील मराठा आरक्षण मोर्चाला पाठींबा देण्यासाठी भेट.

मराठा आरक्षणा साठी आंदोलन करणाऱ्या माझ्या सर्व सामाज बांधवाना पाठींबा देण्यासाठी पाथरी आणि मानवत येथे भेट दिली.आरक्षण मिळाले पाहिजेच,परंतु या मध्ये जीवित हानी होइल इतकी टोकाची भूमिका घेऊ नये.आरक्षण प्रश्न हा न्याय प्रविष्ठ आहे, शासनाने आरक्षण मिळावे याच पद्धतीने न्यायलयात भूमिका मांडली , मराठा मूक मोर्चा ज्या शिस्तित झाला त्याचे जगभरातून कौतुक झाले .